Pramod DherePramod DherePramod Dhere
Survey No 17/4, Mangalnagar, Dange
Chowk, Wakad Road, Thergaon, Pune-33.
+91 92 71 669 669
Pramod DherePramod DherePramod Dhere

जाणून घ्या पाणी पिण्याची शिस्तबद्ध पद्धत

  • Home
  • Blog
  • जाणून घ्या पाणी पिण्याची शिस्तबद्ध पद्धत

प्रत्येकाने दिवसभरातून तीन ते चार लिटर पाणी पिलेच पाहिजे. मात्र ते पाणी पिताना शिस्तबद्ध पद्धतीने पाणी पिणे महत्त्वाचे आहे, गरजेचे आहे.

सकाळी उठल्या उठल्या तहान नसली तरी तुम्ही एकावेळी एक आख्खा तांब्या पाणी पिणे गरजेचे आहे, तेही तोंडसुद्धा न धुता सावकाशपणे प्यायला हवे. कारण रात्रभर आपण झोपलेलो असतो, मात्र आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक ॲसिड बनण्याची प्रक्रिया चालूच असते त्यामुळे सकाळी सकाळी आपल्या पोटात ॲसिडीक वातावरण थोडे अधिकच असते. अशा वेळी आपण पाणी पिले तर पोटातील ॲसिडीक वातावरण कमी व्हायला मदत होते. त्यात तोंडसुद्धा न धुता सावकाश, तोंडात पाणी फिरवत पिले तर तोंडातील जास्तीतजास्त लाळ पाण्यासोबत पोटात जाते. ही लाळ क्षारीय म्हणजेच Alkaline असते, त्यामुळे सकाळी सकाळी पाण्यासोबत जास्तीतजास्त लाळ पोटात गेली तर पोटातील ॲसिडीक वातावरण व लाळेचा क्षारीय म्हणजेच Alkaline गुणधर्म यामुळे पोटातील वातावरण सामान्य म्हणजेच Nutral राहायला मदत होते. म्हणजेच पोटातील आम्लता कमी होते, परिणामी रक्तातील आम्लताही कमी होते व त्यामुळे वात-पित्त-कफ नियंत्रणात राहून आपले आरोग्य चांगले राहायला मदत होते. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या तोंडसुद्धा न धुता साधारण तांब्याभर पाणी सावकाशपणे प्यायची सवय लावा. हेच पाणी कोमट असेल तर उत्तमच कारण त्यामुळे आतड्यांवर दबाव पडून म्हणजेच प्रेशर येऊन पोट साफ व्हायलाही मदत होते. याच पाण्यात आर्धा लिंबू पिळल्यास आपल्या शरीराला ‘क’ जीवनसत्त्वही (Vit-C) मिळते व आपल्या शरीराचे आतून शरीरशुद्धीकरणही होते. हेच पाणी रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले असेल तर अतिउत्तम कारण त्यामुळे कॉपर हे खनिज आपल्या शरीराला मिळते जे हिमोग्लोबीन वाढविण्यासाठी मदत करते व त्यामुळे आपले रक्ताभिसरणही उत्तम होते.

हे झालं सकाळी उठल्या उठल्या तांब्याभर पाणी का व कसे प्यावे याबद्दल. फक्त सकाळी उठल्या उठल्या तुम्ही एकावेळी एक आख्खा तांब्या पाणी पिऊ शकता, मात्र दिवसभरात कधीही एकावेळी एक आख्खा तांब्या पाणी प्यायचं नाही. एकावेळी एक ग्लास असे दर तासा-तासाला एक -एक ग्लास असे आठ ते दहा ग्लास, जास्तीतजास्त बारा ग्लास असे दिवसभरातून तीन ते चार लिटर पाणी पिले पाहिजे. तेही जेवणापूर्वी आर्धा ते पाऊण तास आधी पिलेले असावे व जेवणानंतर एका तासांनी एक ग्लास व तिथून पुढे दर तासा-तासाला एक-एक ग्लास असे दिवसभरातून ३ ते ४ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. मात्र जेवताना व जेवणानंतर लगेच पाणी प्यायचे नाही कारण आयुर्वेदानुसार ‘भोजनांते विषंवारी’ म्हणजेच जेवणानंतर लगेच पाणी पिणे आयुर्वेदामध्ये विषासमान मानले आहे. कारण भूक लागणे म्हणजेच जठराग्नी प्रदिप्त होणे. भूक लागल्यावर जेव्हा आपण काहीतरी खातो तेव्हा ती जी प्रदिप्त झालेली जठराग्नी असते ती आपलं खाल्लेलं अन्न पचवायच्या कामाला लागते. ती एक प्रकारची अग्नी आहे, मग त्यात पाणी ओतलं तर काय होणार ?….. ती अग्नी विझणार. म्हणजे तुम्हीच तुमच्या या जेवणासोबत व जेवणानंतर लगेच पाणी पिण्याच्या सवयीने तुमच्याच पचनक्रीयेमध्ये बाधा निर्माण करत असता म्हणून जेवताना व जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची सवय कमी-कमी करत बंद करा. मग आता जेवणानंतर एका तासांनीच का पाणी प्यायचं तर ही जठराग्नी एकदा प्रदिप्त झाली तर निसर्ग नियमाप्रमाणे एक तासभर प्रदिप्त राहते व त्या तासाभरात आपलं खाल्लेलं अन्न पचवायचं काम पूर्ण करुन शांत होऊन जाते. तेव्हा तुम्ही पाणी प्यायला काही हरकत नाही. त्याचा तुमच्या पचनक्रीयेवर विपरीत परिणाम होत नाही. उलट त्यानंतर ती तुमच्या शरीराची गरजच असते.

बरं पाणी नेहमी बसून प्यायचं उभं राहून प्यायचं नाही, पाणी नेहमी ग्लास तोंडाला लावून सिप सिप करत प्यायचं वरुन प्यायचं नाही. जर तुम्ही उभं राहून व वरुन पाणी पिण्याची सवय लावली तर त्याचाही तुमच्या पचनक्रीयेवर विपरीत परिणाम होऊ शकतो व भविष्यात गुडघेदुखी, संधीवात असे विकार होऊ शकतात.
शिवाय नेहमी सामान्य तापमानाचेच पाणी प्यायला हवे. फ्रीजमधील अतिथंड पाणी पिणे टाळले पाहिजे कारण त्याचाही तुमच्या पचनक्रीयेवर विपरीत परिणाम होऊन भविष्यात पचनक्रीयेसंबंधीत व्याधी जडू शकतात. फारफार तर उन्हाळ्यात मडक्यातील थंड पाणी चालू शकते कारण ते नैसर्गिक मार्गाने सामान्य थंड झालेले असते ते फ्रीजमधल्यासारखे अतिथंड नसते.

शिवाय पाणी नेहमी सावकाश प्यावे. एक ग्लास पाणी प्यायला १० ते १५ मिनिटे लावावी. पाणी पिताना ते थोडा वेळ तोंडात धरुन ठेवावे, तोंडात थोडा वेळ फिरवावे जेणेकरुन त्यात लाळ मिसळेल व जास्तीतजास्त लाळ पोटात जाईल व पोटातील वातावरण सामान्य म्हणजे Nutral राहायला मदत होईल. म्हणजेच पोटातील ॲसिडीटी (आम्लता) कमी होईल, परिणामी रक्तातील आम्लताही कमी होईल व त्यामुळे वात-पित्त-कफ नियंत्रणात राहून आपले आरोग्य चांगले राहायला मदतच होईल.

अशाप्रकारे दिवसभरात पुरेसे व शिस्तबद्ध पद्धतीने पाणी पिण्याची सवय लावली तर आपले आरोग्य चांगले राहण्यास मदतच होईल. हे व्हिडीओ रुपात पहायचे असेल तर खालील लिंक क्लिक करा व पहा व इतरांनाही पाठवा.

Leave A Comment

X