संपूर्ण शरीर तपासणी शिबीरांसाठी जी अद्ययावत अशी Quantum Body Analiser ही मशिन वापरण्यात येते त्या मशिनचे प्रॉपर ट्रेनिंग डॉक्टर व निसर्ग उपचार तज्ञांना देण्यात येते. त्याचे त्यांना सर्टिफिकेटही देण्यात येते व त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना योग्य त्या प्रशिक्षणानंतर तपासणी शिबीरांसाठी पाठवून उत्पन्नाचे साधनही उपलब्ध करुन देण्यात येते.तसेच त्यांना त्यांची प्रॅक्टिस सेट करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्यही करण्यात येते. शिवाय ज्यांना व्याख्यानासाठी तयार केले जाते. त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे व्याख्यानांसाठी पाठवून व्याख्यानांसाठी एक प्लॅटफॉर्मही उपलब्ध करुन दिले जाते.
अशा प्रकारे डॉक्टर व निसर्ग उपचार तज्ञांना त्यांची स्वतःची प्रॅक्टिस सेट करुन तसेच व्याख्याने व शिबीरांच्या माध्यमातून विधायक मार्गाने प्रतिष्ठेसह उत्पन्नाचा एक उत्तम मार्ग उपलब्ध करुन दिला जातो, त्यासाठी त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देण्यात येतो.
