व्याख्यानानंतर व्याख्यान आवडल्यामुळे व व्याख्यानातील सर्व माहिती व अजूनही बरीच महत्वपूर्ण माहिती संकलितपणे आपल्याकडे असावी असे प्रत्येकाला वाटते. म्हणून व्याख्यानानंतर माझ्या ‘आरोग्याची दिनचर्या’ या पुस्तकाची विक्रीही होते. त्यातून व्याख्याते व आयोजकांना मानधनही उपलब्ध करुन दिले जाते. तसेच पुस्तक विक्रेत्यांनाही आवाहन करुन व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांना या पुस्तकविक्रीतून उत्पन्न उपलब्ध करुन देण्यात येते व त्यांनाही आपल्या विधायक उपक्रमांत सहभागी करुन घेण्यात येते.
‘आरोग्याची दिनचर्या’ या पुस्तकातून माझ्या व्याख्यानाची स्क्रीप्ट व आजपर्यंत माझी जी २७७ व्याख्याने झाली त्या व्याख्यानांनंतर मला उपस्थितांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. तेही अगदी साध्यासोप्या भाषेत, साध्यासोप्या पद्धतीने. त्यामुळे पुस्तकवाचनातून वाचकांच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी हा पुस्तकरुपी ठेवा असायलाच हवा.