Artlife Wellness Products Pvt. Ltd. या माध्यमातून अधुनिक पद्धतीने विनागुंतवणूक व्यवसाय करण्याची पद्धत शिकवून डॉक्टर, निसर्ग उपचार तज्ञ तसेच समाधानी ग्राहक यांना व्यवसायासाठी उद्युक्त केले जाते.
ज्यांना व्याख्याता बनायचे आहे त्यांना तसे प्रॅक्टिकल ट्रेनिंग देऊन व्याख्याता बनण्यासाठी सहकार्य करुन व्याख्यानांसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला जातो.
जे डॉक्टर किंवा निसर्ग उपचार तज्ञ तपासणी शिबीरांना जाण्यासाठी इच्छुक असतील त्यांना त्या तपासणीसाठी लागणारी मशिन सवलतीत उपलब्ध करुन त्या मशिनचे योग्य ते प्रशिक्षण देऊन मागणीप्रमाणे शिबीरांनाही पाठवण्यात येते. तसेच नवोदित डॉक्टर व निसर्ग उपचार तज्ञांना सर्व प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांची प्रॅक्टिस सेट करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येते. तसेच गरजू व इच्छुक समाधानी ग्राहकांना या व्यवसायात घेतले जाते. काही समाधानी ग्राहक त्यांच्या ट्रीटमेंट चा खर्च काढण्यासाठी थोडाफार व्यवसाय करतात, काही समाधानी ग्राहक उत्पन्नाची गरज म्हणून पार्ट टाईम हा व्यवसाय करतात, तर काही समाधानी ग्राहक पूर्ण क्षमतेसह हा व्यवसाय करुन आपले उज्वल भविष्य घडवतात.
अशाप्रकारे व्याख्याते, डॉक्टर, निसर्ग उपचार तज्ञ व ग्राहक सर्वांना टिमवर्कचा लाभ मिळून उत्पन्नाची चांगली संधी मिळवून देण्यात येते. सर्वकाही पूर्णपणे पारदर्शकतेने होते व सर्वांनाच प्रतिष्ठेसह चांगले उत्पन्नही मिळते.