ही आमची २०१४ ला स्थापन करण्यात आलेली सेवाभावी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आरोग्यविषयक क्षेत्रामध्ये भरीव काम करण्याचा नेहमीच प्रयत्न होत असतो. या संस्थेच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृती म्हणून आरोग्यविषयक व्याख्याने पूर्णपणे मोफत दिली जातात. त्यासाठी कसल्याही प्रकारचे मानधन घेतले जात नाही. तसेच संपूर्ण शरीर तपासणी शिबीरेही सवलतीत करण्यात येतात. त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे पत्रही मिळाले आहे. शिवाय या संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर, निसर्ग उपचार तज्ञ, व्याख्याते व आमच्या अशा विधायक उपक्रमांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या समाधानी ग्राहकांना प्रतिष्ठेसह चांगले उत्पन्नही मिळते. अशाप्रकारे सर्वांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे काम संस्थेच्या वतीने करण्यात येते. त्यासाठी वेळोवेळी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करण्यात येते.