आमच्या ‘उमादेवी ढेरे प्रतिष्ठान’ या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर अशी शिबीरे घेत असतो. याची सविस्तर माहिती व्याख्यानांनंतर जेव्हा दिली जाते तेव्हा या तपासणीचे महत्त्व पटून लोकं उत्स्फुर्तपणे तपासणीसाठी तयार होतात. ज्या तपासण्यांना किमान सात ते आठ हजर रुपये खर्च येऊ शकतो. अशा तपासण्या संस्थेच्या माध्यमातून, शिबीरांच्या माध्यमातून फक्त रु.५००/- मध्ये केल्या जातात. संपूर्ण शरीर तपासणी एकाचवेळी होत असल्यामुळे प्रत्येकाचा साठ ते सत्तर पानांचा रिपोर्ट तयार होतो. त्यामुळे प्रत्येक पेशंटला समुपदेशनासाठी पंधरा-वीस मिनिटे ते आर्ध्या तासांचा कालावधी देण्यात येतो. त्यामुळे एका दिवसात फक्त १५ ते २० पेशंट तपासण्यात येतात. ज्याचा-त्याला ज्याच्या-त्याच्या वॉट्सॲपवर PDF फॉर्म्याटमध्ये रिपोर्टही पाठवण्यात येतो. तसेच दिनचर्येतील योग्य तो बदलही सुचवला जातो जेणेकरुन भविष्यात अशी आरोग्यविषयक समस्या पुन्हा निर्माण होऊ नये.
शिवाय ट्रीटमेंट हर्बल व शास्त्रशुद्ध सुचवली जाते. त्यामुळे कमी कालावधीतच खूप चांगला परिणाम पहायला मिळतो. तोही कोणत्याही साईडइफेक्टशिवाय.